सत्यशील शेरकरांच्या प्रचारार्थ राजुरीत सभा
बेल्हे – भाजपाने पक्ष फोडण्याचे काम केले आहे.त्यांना शेतकर्यांचे काहीही घेणे देणे नसल्याने या सरकारला घरी बसवण्याची हिच वेळ असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनाच मतदान करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) सत्यशील शेरकर यांच्या प्रचार दौरा दरम्यान राजुरी (ता. जुन्नर) येथे आयोजित सभेत खासदार सुळे बोलत होत्या. याप्रसंगी ठाकरे गट उपनेते बबनराव थोरात, उमेदवार सत्यशील शेरकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद लेंडे, अनंतराव चौगुले, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी,
ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, पवार गटाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, किशोर दांगट, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप, माजी सभापती दिपक औटी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, मोहीत ढमाले, अंकुश आमले, स्नेहल शेळके, वल्लभ शेळके, बाजीराव ढोले, योगेश पाटे, सुरेखा मुंढे, सुरेखा वेठेकर, दिलीप कोल्हे, ऋषी डुंबरे,संभाजी तांबे, गुलाब पारखे, गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, भास्कर गाडगे, मंगेश काकडे, मोहन बांगर, गुलाम नबी शेख, एम. डी. घंगाळे, पुष्पा कोरडे, अशोक घोडके, लहू गुंजाळ, जाणकु डावखर, हरिदास ताजवे, मंजिरी घाडगे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
भाजप पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्ष फोडण्याचे काम केले आहे. तसेच या भाजप सरकारने शेतकर्यांच्या ताटात माती कालवाले असल्याने त्यांना घरी पाठवण्याची हीच योग्य संधी आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनाच मतदान करायचे आहे.
– बबनराव थोरात, उपनेते, ठाकरे गट
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लगेचच राजुरी-बेल्हा जिल्हा परिषदेच्या गटात असलेली प्रलंबित असलेली कामे लवकरच सोडविण्यात येतील तसेच तालुक्यात जीएम आरटीमुळे असल्यामुळे एमआयडीसी होत नसल्याने अनेक तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच अणे पठारावर प्रलंबित असलेला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– सत्यशील शेरकर, उमेदवार, महाविकास आघाडी