खिलेगा तो कमलही; एक्‍झीट पोलचा अंदाज

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्ष विरोधकांचा मोठ्या फरकाने पराभव करेल, असा सर्वच निवडणुकोत्तर कल चाचण्यांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात 230 ते 166 अशा जागा भाजपा शिवसेना मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याबाबतचे सत्य गुरूवारी (दि. 24) स्पष्ट होईल.

टाईम्स नाऊने केलेल्या जनमत चाचणीत भाजपा सेना युतीला 229 जागा मिळतील. तर कांग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 48 आणि अपक्षांना 11 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया टुडे ऍक्‍सिस माय इंडिया पोलच्या अंदाजानुसार भाजपा सेना 166 ते 194, कॉंग्रेस-राष्ट्रवादी 72 ते 90 आणि अपक्ष 22 ते 43 जागांवर विजय मिळवेल. तर सीएनएनच्या सर्वेक्षणानुसार भाजपा सेना 243, कॉग्रेस राष्ट्रवादी 41 तर अन्य चार उमेदवार विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.टीव्ही 9 च्या सर्वेक्षणानुसार भाजपा सेना 197, कॉंग्रेस राष्ट्रवादी 75 तर 16 अन्य उमेदवार विजयी होतील.

हरीयाणात टाईम्स नाऊच्या अंदाजानुसार भाजपा 71, तर कॉंग्रेस 11 कॉंग्रेसला मिळतील, रिपब्लिक टिव्हीच्या सर्वेक्षणात भाजपाला 52 ते 63 तर कॉंग्रेसला 15 ते 19 जागा मिळतील. इंडिया न्युजच्या सर्वेक्षणानुसार भाजपा 75 ते80 तर कॉंग्रेस 9 ते 12 जागा मिळतील

Leave A Reply

Your email address will not be published.