पोस्ट ऑफिसात पत्रांचा पाऊस; ममता-भाजपच्या संघर्षात पोस्ट खात्याला ताप

कोलकाता – ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये पोस्ट खात्याला त्रास होत आहे. दक्षिण कोलकातामधील कालिघाट पोस्ट ऑफिसात हजारो पोस्टकार्डांचा ढीग लागला आहे. बॅनर्जी यांच्यासाठी ही पोस्टकार्ड असून यावर जय श्रीराम लिहिण्यात आले आहे. बॅनर्जींचे निवासस्थान याच पोस्ट ऑफिसच्या अख्यत्यारित येते.

राज्यातील हजारो भाजप कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने पोस्टकार्ड पाठवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेआधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर दररोज 30 ते 40 पत्रे, असायची. मात्र आता अचानकपणे पत्रांचे प्रमाणे वाढले आहे.

कालिघाट पोस्ट ऑफिसच्या एकूण पत्रांपैकी ममतांच्या निवासस्थानासाठी असलेल्या पत्रांचे प्रमाण 10 टक्के आहे. कालिघाट पोस्ट ऑफिसने ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या निवासस्थानासाठी एक पोस्टमन नियुक्‍त केलेला आहे. आतापर्यंत शांत दिसणारे हे पोस्ट ऑफिस अचानक गजबजून गेले आहे. जय श्रीराम लिहिलेल्या ढीगभर पत्रांचा निपटारा करण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)