सेना भाजपची युती होणारच : ना.चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, (प्रतिनिधी): कोल्हापूरातील भीमा कृषी प्रदर्शनात महसूलमंत्री चांदटकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. कोल्हापूरच्या राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे, उदघाटन होताच दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात धनंजय महाडिक नेमके कोणाचे हे सांगताना दिलेल्या उदाहरणात एकच हास्या पिकाला.

सेना भाजपची युती होणारच – चंद्रकांत पाटील
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपच्या युती होणार की नाही याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षांकडून अध्याप याबाबत स्पष्ट असे संकेत देण्यात आले नाहीत. सेना भाजपच्या युतीच्या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी राजकारण करत आहेत. पण या युतीच्या मुद्यावरून सुरू असणाऱ्या राजकारणाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. कोल्हापूरातील भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेना आणि भाजपची युती होणार असे स्पष्ट केले आहे. शिवाय कोल्हापूर लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच असल्याने शिवसेनेचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर युतीबाबतच्या सर्वच चर्चांना मंत्री पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी “सैराट’सिनेमाचे उदाहरण दिले, आपल्या मुलीने दुसऱ्या मुलाशी मनाविरुद्ध लग्न केले म्हणून त्याच्या आई-वडिलांनी त्या दोघांनाही मारण्याची सुपारी दिली. जर मी त्या ठिकाणी असतो तर मी असे केले नसते. त्यांच्यावर पहिला रागावलो असतो, शिव्या घातल्या असत्या, नंतर म्हटलं असतं ठीक आहे, तिने आता लग्न केलं आहे, सगळं विसरून तिचा संसार सुखाचा होऊदेत. बायकोला म्हटलं असतं आपलीच मुलगी आहे, घेऊन टाका घरी. तसं धनंजय महाडिक यांनी आमच्या मनाप्रमाणे लग्न केलं असतं, तर बरं झालं असतं. पण त्यांनी मनाविरुद्ध लग्न करुन सुद्धा ते आमची मुलगीच आहेत. त्यामुळे ती सुखात राहावी. तिच्यावर आमचं प्रेम आहेच. असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर हाच धागा पकडत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, दुसऱ्याची पोरगी मिरवण्याची इच्छा बऱ्याच लोकांना व्हायला लागली आहे. आणि इकडे माहेरची माणसं घोटाळा फार करतात. मुलीला नवऱ्यासोबत वेगळे रहा असे सांगणाऱ्या आयांची संख्या देशात कमी नाही. पण शहाण्या मुली नवऱ्याने कष्टाने, प्रामाणिकपणे साधी भाजीभाकरी असुदेत, कष्टाने मिळवलेली बैलगाडी असुदेत ते ही एम्पला (महागडी गाडी) पेक्षा खऱ्या आणि निष्टेच्या पत्नीला फार मोठी असते आणि हे धनंजय महाडिक यांच्यातून आम्हाला कळलेले आहे. असेही ते म्हणाले. दोघांमधील या जुगलबंदीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)