सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर-हवेली विधानसभा चे प्रश्न सुटले पाहिजेत या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचे सर्व कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करीत असतात हे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचा आमदार असणे गरजेचे आहे. यासाठीच पुरंदरच्या जागेची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असून ही जागा भाजपाला मिळणार आहे.
त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन प्रचार करणे गरजेचे असल्याचे मत कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांनी सांगितले.
सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वासुदेव काळे बोलत होते.
यावेळी भाजपाचे नेते व समन्वय समितीचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, भाजप पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश जगताप, शेखर वाढणे, संतोष जगताप, मंगल पवार, सचिन लंबाते, अजिंक्य टेकवडे श्रीकांत ताम्हाणे, राहुल शेवाळे, सोमनाथ कणसे, स्नेहल दगडे, संदीप देवकर, संदीप हरपळे आदी उपस्थित होते.
वासुदेव काळे म्हणाले की, पक्षाकडे उमेदवारी माघताना इलेक्टीव मेरिटवर जागा मागितली पाहिजे. सर्व पक्षांचा सर्व्हे करण्यात यावा यानंतर ज्याची जास्त ताकद आहे त्यालाच पुरंदर-हवेलीची जागा मिळावी अशी मागणी मुंबई येथील बैठकीमध्ये करण्यात आली आहे.
निवडणुका आल्या की गुंजवणीचे पाणी विमानतळ राष्ट्रीय बाजार यासारखे मुद्दे पुढे केले जातात व गुंजवणीचे भूमिपूजन नारळ फोडणे असे कार्यक्रम केले जातात पुरंदर मधील हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचा आमदार असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्याचे काम भाजपाकडून करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील आमदार हा कमळाच्या चिन्हावर निवडून येणे गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजना, शेतकर्यांसाठी मोफत लाईट बिल यासारख्या अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने आणल्या आहेत. अशोक टेकवडे, माजी आमदार
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये 4 लाख 48 हजार मतदार असून यामध्ये पुरंदरमध्ये 2 लाख 38 हजार मतदार आहेत व 2 लाख 20 हजार मतदान हे हवेली तालुक्यामध्ये असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना हवेलीमधून 6 हजार तर पुरंदरमधून 29 हजार मताधिक्याने सुनेत्रा पवार या पाठीमागे होत्या.
यामध्ये महाविकास आघाडीने फेक नेरीटीव सेट केला असल्यामुळे मताधिक्य घटले; परंतु पुरंदर हवेली-मध्ये भाजपाचा उमेदवार निश्चितपणाने निवडून येऊ शकतो.- जालिंद कामठे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे
गुलाबी फेट्याचे चर्चा
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने गुलाबी रंगाला प्रमोट केले असून आज महिलांनी गुलाबी फेटे परिधान करण्यात आले होते. यामुळे अजित दादांच्या गुलाबी फेट्यांची चर्चा संपूर्ण सभागृहात होती.