भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदीचं पुन्हा पंतप्रधान होणार- गडकरी

नागपूर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असून देशात पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार, असा दावा केला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम मोदी’ या सिनेमाच्या पोस्टरचं नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधला.

गडकरी म्हणाले, एक्झिट पोलचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही, पण भाजप सत्तेत येईल याचे ते संकेत आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि केंद्रात एनडीएचं सरकार येईल. महाराष्ट्रातही २०१४ सारखेच निकाल लागतील. पंतप्रधान पदाच्या इच्छुकतेबद्दल त्यांना प्रश्न केला असता. “आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो. त्यामुळे स्वाभाविकपणे तेच पंतप्रधान होती”, असे गडकरींनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.