स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपला वर्चस्व मिळणार – दादासाहेब सातव

वाघोली – पुणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागामध्ये भाजप पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव, तालुका व जिल्हा स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांवर जास्तीत-जास्त भाजपचे लोकप्रतिनिधी निवडून येऊन  भाजप आपले वर्चस्व सिद्ध करत असल्याची माहिती  पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी दिली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायतीमध्ये गावोगावी भाजपचे सदस्य ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बनू लागले आहे.

सरपंच,उपसरपंच याच बरोबर ग्रामपंचायतीचे पॅनल प्रमुख देखील भाजपचे पदाधिकारी असल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समावेश झाल्यानंतर या 23 गावांचे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त भाजपच्या असतील यासाठी भाजप पक्षाच्या वतीने संघटना व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी काम केले जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर भागात देखील स्थानिक पातळीवर भाजपचे कमळ सर्वत्र दिसावे यासाठी माजी मंत्री संजय भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, खासदार गिरीश बापट आदींच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असून त्याला यश मिळायला सुरुवात झाली असल्याचे सातव पाटील यांनी सांगितले.

मांजरी खुर्द येथे स्वप्नील उंद्रे यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून याप्रसंगी माजी उपसरपंच हिरामण गवळी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निखिल उंद्रे, कल्पेश थोरात,  दत्तात्रय खुळे,माऊली उंद्रे, संदीप सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.