भाजप प्रचाराचे रणशिंग फुंकणार

भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज पुण्यात

पुणे – भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा सोमवारी पुण्यात येत असून त्यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी रविवारी दिली.

याप्रसंगी खासदार गिरीश बापट, पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. नड्डा यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. “नड्डा हे सकाळी पुण्यात आल्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलणार आहेत. त्यापूर्वी दुपारी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

मेळाव्यानंतर रात्री राष्ट्रीय एकता अभियानाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध मान्यवरांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत,’ असे मिसाळ म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.