साध्वी प्रज्ञासिंहांची भाजपकडून पाठराखण; त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले

नवी दिल्ली – शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे वादात अडकलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपकडून पाठराखण करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हंटले आहे. ते कोलकाता येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमित शहा म्हणाले कि, साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याद्वारे जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले. कोर्टात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. ते पुढे म्हणाले, स्वामी असीमानंद आणि इतर लोकांनाही खोटे खटले दाखल करुन आरोपी बनवण्यात आले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडण्यात आले होते त्यांना का सोडण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.