निवारी (मध्य प्रदेश) : – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांना धमकावल्याबद्दल नवीन वाद निर्माण झाला आहे. एका जाहीर सभेला संबोधित करताना कमलनाथ म्हणाले की, पोलिसांकडून पक्षपातीपणाने कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे. येत्या आठ महिन्यात राज्यात निवडणुका होणार आहेत. त्यानंतर आम्हीं सत्तेवर आल्यानंतर अशा पोलिस अधिकाऱ्यांचा चांगलाच हिशोब घेतला जाईल (अच्छा हिसाब लिया जायेगा) असा इशारा त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, मध्यप्रदेशात आठ महिन्यांत निवडणुका होतील आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की आक्रमक होऊ नका किंवा घाबरू नका. आगामी निवडणुकीत प्रत्येकाचा हिशोब घेतला जाईल हे सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी कान उघडून ऐकावे असा इशारा कमलनाथ यांनी दिला.
त्यांच्या या विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. या प्रकारची मानसिकता हे ‘मोहब्बत की दुकान’ नसून ‘धमकी की दुकान’ असल्याचे दाखवते अशी टीका भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.
कॉंग्रेसने नेहमीच आणीबाणीच्या मानसिकतेवर, धमकावण्याच्या, सूडाच्या आणि सूडाच्या राजकारणावर विश्वास ठेवला आहे, मध्य प्रदेशात पक्ष नेमके हेच दाखवले जात आहे असे भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे.