जामखेड – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. यातच रोहित पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कर्जत येथील सभेत भाजप पक्षाच्या समाचार घेतला.
महाराष्ट्रात सध्या #कर्जत-जामखेडचीच चर्चा सुरु आहे. इथल्या तरुणाने भाजपाची झोप उडवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री तीन-तीन सभा कर्जत-जामखेडमध्ये घेत आहेत. #NCP2019 pic.twitter.com/932b5xtySn
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 19, 2019
शरद पवार म्हणाले की,’भाजप सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. अनेक उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आघाडीच्या पाठिशी आहे. या निवडणुकीत तरुणांनी भाजपची झोप उडविली आहे’ अशी टीका ही यावेळी त्यांनी केली.