मुंबई : दिल्ली भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनानंतर देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्याची मागणीसह सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले कि, भाजपने रायगडावर जाऊन नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने कधीही महाराजांचा अपमान सहन केलेला नाही. पण आता सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यास जनता तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, याआधी धनंजय मुंडे यांनी ट्विट करत हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे म्हंटले होते.
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. pic.twitter.com/vB7AjieBcI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 12, 2020