मुंबई : पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. पालघरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा रंगतदार लढती होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. तर सेनेनेहीचांगली मुसंडी घेतली आहे.
पालघर जिल्हा परिषदेत ५७ जागा आहेत. त्यापैकी ११ जागांवर शिवसेना तर १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आहे. या निवडणुकीत माकपला पाच जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पालघर जिल्हा परिषद निकाल :
एकूण जागा : ५७
निकाल जाहीर : ४१
शिवसेना : ११
माकपा : ५
भाजप : ६
राष्ट्रवादी : १३
काँग्रेस : १
बविआ : ३
मनसे : ०
अपक्ष : २