भाजप-शिवसेना युतीनं लढले अथवा स्वबळावर, यांचा पराभव निश्चित आहे : अजित पवार

मुंबई: शिवसेनेचं आपल्या बाजूनं झुकतं माप असावं, यासाठी भाजपाचा चाललेला प्रयत्न म्हणजेच त्यांनी अन्य पक्षांच्या महाआघाडीची धास्ती घेतल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे युतीनं लढले काय अथवा स्वबळावर, यांचा पराभव निश्चित आहे. जनता पुन्हा भुलणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

निवडणूक तोंडावर आली तरी भाजप-शिवसेना युतीचे घोडे अजून चर्चेच्या फडातच अडकले आहे. जर युती करायची असेल तर, महाराष्ट्रात आमचाच मुखमंत्री पाहिजे.असा पुनरुच्चार शिवसेनेकडून आला आहे.

भाजप-शिवसेना युतीला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, लोकसभेच्या भाजपला २५ जागा तर शिवसेनेला २३ जागा आणि विधानसभेच्या १४५ जागा भाजप तर १४३ जागा शिवसेना लढवणार होत्या. मात्र याला दोन्ही पक्षाकडून कोणत्याही प्रकाचा दुजोरा मिळाला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)