पुणे – युतीच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणतीच घोषणा झालेली नाही. परंतू, कोथरूड विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमत्री चंद्रकांत पाटील निवडणूक लढविणार असल्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले. त्यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून, मग विद्यमान आमदारांचे काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परंतू कोथरूडमधून चंद्रकांत पाटील निवडणूक लढविणार असेल तर शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे निवडणूक लढविणार आहे, असे स्वत: मोकाटे यांनी प्रभातशी बोलताना संगितले. यावरून शिवसेना बंडखोरी करणार असून, हे निश्चीत झाले. मात्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला असून, मुरलीधर मोहोळ यांचीही संधी हुकली आहे.