संधीसाधू लोकांनी भरलेले भाजपचे जहाज बुडणार – अशोक चव्हाण

मुंबई: आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून फुटून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या आमदारांवर कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तोंडसुख घेतले. भाजपमध्ये सद्या महाराष्ट्रातील भाजपचे जहाज संधीसाधू लोकांनी तुडुंब भरले आहे. “ओव्हरफ्लो’ झालेले जहाज बुडते हा नियमच आहे. त्यामुळे ते बुडणार हे नक्की.. असे भाकीत अशोक चव्हाण यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सध्या “इनकमिंग’ सुरु आहे. नजीकच्या काळात आणखी काही नेते प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. यापार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी ट्‌विट करून भाजपला बुडत्या जहाजाची उपमा दिली. जहाज क्षमतेपेक्षा जास्त भरल्यास ते बुडतेच, असे चव्हाण यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)