तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी कडून तीन ठिकाणी मतदार नोंदणी कक्ष उभारण्यात आले असून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन मावळ तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे व तळेगाव दाभाडे शहर भाजपचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी केले.
सदर मतदार नोंदणी कक्षाचे उद्घाटन करताना युवा उद्योजक . श्रीकृष्ण भेगडे ,भाजपा मावळ तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत नाटक, स्वप्निल भेगडे,तनुजा दाभाडे, अतीश रावळे, शिवांकुर खेर,
भाजपा मावळ तालुका युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रणेश नेवाळे, अमित भागीवंत,उपाध्यक्ष सतीश पारगे,मृदाला भावे, मंगेश थोरवे, अनिल वेदपाठक, पौर्णिमा उपाध्याय, संध्या जाधव,स्मिता पोरे, विनोद उपाध्याय आदी उपस्थित होते.
मतदार नोंदणी कक्ष दि 13 ते 16 ऑगस्ट पर्यंत भारतीय जनता पार्टी कार्यालय , तळेगाव दाभाडे , मराठा क्रांती चौक तळेगाव दाभाडे (स्टेशन) आणि युनिक हॉस्पिटल जवळ , मनोहर नगर येथे कार्यरत राहणार आहे.
या अंतर्गत नवीन मतदार नावनोंदणी – फॉर्म ६ , मतदार यादीमधून नाव वगळ्यासाठी – फॉर्म ७ , मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी फॉर्म ८ , मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी – फॉर्म ८ अ इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जास्तीत जास्त मतदारांनी आपली नाव नोंदणी करून लोकशाही सशक्तिकरणासाठी हातभार लावावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.