भाजप-सेनेचा लोणावळ्यात जल्लोष

लोणावळा – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्थ पवार सारख्या तगड्या उमेदवाराला चितपट करीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मिळविलेल्या विजयाच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा शहरात भाजप सेनेच्या वतीने जल्लोष रॅली काढण्यात आली.

मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत सर्वांना अपेक्षित होती. त्यामुळे युती आणि आघाडी या दोन्हीकडील नेते आणि कार्यकर्ते आपल्या विजयाची गणित मांडताना विजयी उमेदवाराला मिळणारी आघाडी ही अत्यल्प असल्याचे सांगत होते. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी युतीच्या श्रीरंग आप्पा बारणे यांनी दोन लाखांहून अधिक मतांची आघाडी घेत सर्वांची गणित चुकीची ठरवली.

लोणावळा शहरात सेनेचे आप्पा बारणे यांनी राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांच्यावर साडेचार हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली. त्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा शहरातील युतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या वेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष आणि भाजप शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, सेनेचे शहराध्यक्ष नगरसेवक सुनील गायकवाड, सेनेच्या महिला जिल्हा संघटक आणि गटनेत्या शादान चौधरी यांच्यासह दोन्ही पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×