भाजप-सेनेत होणार सरळ लढत

नगर – महापालिकेच्या प्रभाग क्र. 6 अ’ मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत वर्षा रोहन सानप यांचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. 24 जानेवारी अर्ज माघारीची मुदत होती. मात्र एकाही उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नसल्याने भाजप-सेनेत सरळ लढत होणार आहे. त्यामुळे उमेदवाराचे चित्र स्पष्ट झाले आहे. ही पोटनिवडणूक अतिप्रतिष्ठेची बनली असून, राष्ट्रवादीचा कौलच उमेदवाराचे भवितव्य ठरवणार असल्याची चर्चा प्रभागात जोरदार सुरु आहे.

महापालिकेच्या प्रभाग 6 अ’ मधील शिवसेना नगरसेविका सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली.

निवडणूक आयोगाकडून रिक्त जागेवर पुन्हा पोट निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी ही जागा राखीव आहे. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याच प्रभागात पोटनिवडणूक होत असल्याने या निवडणुकीसाठी नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार की, मनपातील भाजप-राष्ट्रवादीची युती या निवडणुकीतही कायम राहणार, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून अनिता लक्ष्मण दळवी यांचा उमेदवारी अर्ज तर भाजपकडून पल्लवी दत्तात्रय जाधव यांचा अर्ज कायम राहिला आहे. त्यातील वर्षा रोहन सानप यांचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे प्रभाग सहा अ मधील निवडणूक अतिप्रतिष्ठेची बनली असून भाजप सेनेत सरळ लढत होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here