भाजप-सेना खासदारांच्या मालमत्तेत 60 टक्‍क्‍यांनी वाढ

“एडीआर’च्या अहवालातील निष्कर्ष; 116 पैकी 33 उमेदवार कोट्यधीश
मुंबई – लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या भाजप-शिवसेना खासदारांची मालमत्ता सरासरी 3.20 कोटी रुपयांनी म्हणजे 60 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. महाराष्ट्र इलेक्‍शन वॉच ऍण्ड असोसिशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्रस (एडीआर)ने सात मतदारसंघात निवडणूक लढवीत असलेल्या 116 पैकी 115 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्‍लेषण करून निष्कर्ष जाहीर केले आहेत.

या अहवालानुसार पहिल्या टप्प्यातील उमेदवारांपैकी 33 उमेदवार कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता दोन कोटी 35 लाख रुपये इतकी आहे. तसेच 19 उमेदवारांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी 10 गंभीर स्वरूपाचे आहेत. यात भाजपच्या पाच खासदारांची सरासरी मालमत्ता 18.99 कोटी, तर शिवसेनेच्या दोन खासदारांची सरासरी मालमत्ता 9.62 कोटी रुपये आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांपैकी 48 जणांनी प्राप्तीकर विवरण घोषित केलेले नाही. तसेच 11 उमेदवारांनी उत्पन्नाचा स्रोत आणि 10 उमेदवारांनी पॅन घोषित केलेले नाही.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रांमध्ये जाहीर केलेली मालमत्ता आणि त्यापैकी 2014 मध्ये निवडणूक लढविताना जाहीर केलेली मालमत्ता यांचे तुलनात्मक विश्‍लेषण एडीआरने आपल्या अहवालात केले आहे. उमेदवारांची सांपत्तिक स्थिती व गुन्हेगारी पाश्वभूमी यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.