भाजप-संघाचे लोक खोटे हिंदु – राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली – भाजप आणि संघाचे लोक हे खोटे हिंदु आहेत. ते केवळ स्वताच्या लाभासाठी हिंदुत्वाचा वापर करताता असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की हे लोक धर्माची दलाली करतात, पण ते खरे हिंदुच नाहीत त्यांचे हिंदुत्व खोटे आहे.

ते म्हणाले की धर्माचा व्यक्तीगत लाभासाठी वापर करायचा नाही अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. जी भाजप-संघाच्या लोकांच्या नेमकी विरूद्ध आहे. या दोनच प्रमुख विचारसरणी देशात आहेत त्यापैकी एक विचारसरणीच देशात राज्य करू शकते असेही त्यांनी नमूद केले. महालक्ष्मी ही शक्तीची देवता आहे. लोकांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी लक्ष्मी उपयोगी पडते. आणि दुर्गा ही लोकांना बळ देणारी आणि लोकांचे रक्षण करणारी देवता आहे.

या सर्व शक्ती बळकट करण्याचे काम कॉंग्रेसच्या काळात झाले पण भाजपच्या काळात धन आणि शक्ती या सर्वांचीच पॉवर कमी झाली असा दावाही राहुल गांधी यांनी केला. महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.