बीड – राज्यात आज 93 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपला काही ठिकाणी जागा मिळा्ल्या आहेत. बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष नेहमी पाहायला मिळतो.
यंदा धनंजय मुंडे यांना भाजपने धक्का दिला आहे. बीडमधील पाचही नगरपंचायतींमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी बाजी मारली आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.
बीडमध्ये मिळालेला विजय आणि राज्यात ठिकठिकाणी मिळालेला विजय हा संपूर्णपणे कार्यकर्त्यांचा आहे… लढाई कड़ी है पर तैयारी और उम्मीद बड़ी है।
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 19, 2022
“सत्ता असूनही सत्ताधारी यश मिळवण्यात कमी पडले आहेत. लोकांनी भाजपलाच (BJP) पहिली पसंती दिली. राज्यातील निकाल पाहिले. त्यातही लोकांनी भाजपलाही साथ दिली. बीडमध्येही ज्या नगरपंचायती होत्या त्यात भाजपला बहुमत मिळालंय असं चित्र स्पष्ट झालंय. बीड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचेही मी आभार मानते,” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.