#लोकसभा2019 : गुजरातमध्ये भाजपने 4 उमेदवारांची यादी केली जाहीर

नवी दिल्ली – भाजपने रविवारी गुजरात लोकसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे, त्यासोबतच तलाला येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही एका उमेदवाराची घोषणा केली आहे.

भाजपने पाटन येथून भारत सिंह ठाकुर, जूनागढमधून राजेश भाई चुडास्मा, आणंद येथून मिटेशभाई पटेल आणि छोटा उदयपूर येथून गीता बेन राठवा यांना लोकसभेची उमेदवारीसाठी तिकिट दिले आहे. याशिवाय तलाल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जसभाई बारद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

https://twitter.com/ANI/status/1112256710461272065

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)