नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आणखी 91 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने आतापर्यंत 287 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, अलाहाबाद पश्चिममधून सिद्धार्थनाथ सिंह, देवरिया सदर मतदारसंघातून शलबमणी त्रिपाठी, प्रयागराज दक्षिणमधून नंदगोपाल नंदी, बाबागंजमधून केशव पासी, पट्टीतून राजेंद्र प्रताप सिंह, मांझपूरमधून लाल बहादूर, फाफामाऊमधून गुरुप्रसाद मौर्य, फुलपूरमधून प्रवीण कुमार पटेल, मीजा यांना उमेदवारी दिली आहे. मेजा येथून नीलम कारवारिया, अयोध्येतील बिकापूरमधून अमित चौहान आणि रुदौलीमधून रामचंद्र यादव यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच इतरही ठिकाणी तिकीट देताना भाजपने सर्वच घटकांची काळजी घेतली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी मतदान सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला राज्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागा, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 59 जागा, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 61 जागा, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 आणि 7 मार्चला सातव्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशात एकूण 403 विधानसभा मतदारसंघ आहेत.