वाघोली (पुणे) – महाराष्ट्र शासनाच्या भ्रष्टाचाराची लक्तरे सरकारी अधिकारी तसेच केंद्रीय तपास पथकाकडून उघड होऊ लागली आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारी सरकारने त्वरित राजीनामे देऊन महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करावा असा संकल्प घेऊन महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चा तसेच तालुका भाजप युवा वॉरियर्स यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा वाघोली येथे निषेध करण्यात आला.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. तसेच सरकारनेदेखील अनागोंदी कारभाराची जबाबदारी निश्चित करून त्वरित मंत्रीमंडळानेदेखील राजीनामे द्यावेत, अशी मागणी युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य गणेश कुटे, पुणे जिल्हा युवा मोर्चा संपर्क प्रमुख नितीन गव्हाणे पाटील, हवेली तालुका युवा वारिअर्स अक्षय कुटे, विशालनाना कुटे, राहुल कुटे, अविनाश कंद, अमोल कुटे, लौकीक शिवले, ऋषिकेश कुटे, अनिल भडे, अवधूत साबळे, दीपक कामती आदी कार्यकर्ते व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.