भोपाळ – मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये कमलनाथ सरकारविरूद्ध भाजपच्यावतीने आज ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात आले आहे. भोपाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले.
ग्वालियर शहरामध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी गृहमंत्री भूपेंद्र सिंह आणि खासदार विवेक शेजवालकर यांनी केले. यावेळी शेजवालकर म्हणाले की कमलनाथ सरकारने विधानसभा निवडणुकांच्यवेळी जनतेला अनेक आश्वासने दिली होती. मात्र, त्याची पूर्तता अजून केलेली नाही.
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा या सरकारने केली होती मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या विरोधात आज आम्ही हे आंदोलन उभारल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेतले आहे.