नवी दिल्ली – दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांना केंद्र सरकाऱ्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्या शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये नमो सेंटर्स सुरू करण्याची योजना आखली आहे.
विविध सरकारी योजनांद्वारे दिल्लीतील नागरीकांना केजरीवाल सरकारने अनेक सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे नागरीकांवर या सरकारचा मोठा प्रभाव आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचाही अशाच पद्धतीने प्रभाव निर्माण करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे असे सांगण्यात येते.
दिल्लीच्या तिन्ही महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असून या तिन्ही महापालिका सन 2007 पासून भाजपच्या ताब्यात आहेत. केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन, उज्जवला योजना अशा योजनांचा झोपडीवासियांना लाभ देण्यासाठी ही नमो सेंटर्स उपयोगी पडतील असे भाजपच्या स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. ही सेंटर्स स्थानिक युवकांमार्फत चालवली जाणार आहेत.