चिंचवडमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्याला “धुतले’

आरोग्य शिबिराचे श्रेय लाटणे पडले महागात

पिंपरी -महाशिवरात्री निमित्ताने चिंचवडगावातील धनेश्‍वर मंदीराच्या विश्‍वस्तांनी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात येऊन भाजपच्या पदाधिकाऱ्याने फोटोसेशन केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांनाही याबाबतचे प्रसिद्धीस पत्रक पाठविलेव व स्वत:ची पाठ ठोपटून घेतली. ही बाब समजताच काही ग्रामस्थांनी त्यास बोलावून याबाबत जाब विचारला. यावेळी संबंधित पदाधिकाऱ्याने उर्मट भाषा वापरल्याने ग्रामस्थांनी त्यास चांगलेच धुतले. यानंतर मात्र या पदाधिकाऱ्याने स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर जाहीर माफी मागितली आहे.

प्रसिद्धी माध्यमांची एखाद्याला चटक लागली तो काही ना काही कारण काढत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतो. असाच एक प्रकार चिंचवडगावातील भाजप पदाधिकाऱ्याच्या अंगलट आला. महाशिवरात्री निमित्त धनेश्‍वर मंदीर आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाजपचा हा पदाधिकारी उपस्थित राहिला. एवढेच नव्हे तर शिबिरातील आपले फोटोही त्याने काढले. ते फोटो आणि माहिती त्याने सोशल मिडियावर प्रसिद्ध केली. धनेश्‍वर मंदीर विश्‍वस्त आणि आपण या शिबिराचे आयोजन केल्याचे त्याने सोशल मिडियावर म्हटले होते. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने प्रसिद्धी माध्यमांनाही याबाबत पत्रक दिले.

भाजप पदाधिकाऱ्याचा हा उद्योग धनेश्‍वर मंदीर विश्‍वस्त आणि ग्रामस्थांना समजला. त्यांनी भाजपच्या “त्या’ पदाधिकाऱ्याला शोधून काढले. तसेच सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि प्रसार माध्यमांना दिलेल्या पत्रकाचा जाब विचारला. या आरोग्य शिबिरात तुझे योगदान काय होते, असा प्रश्‍नही विचारला. झालेल्या चुकीची दिलगिरी

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.