भाजपकडून शंभर कोटींची ऑफर

आमदार शशिकांत शिंदे यांचा गौप्यस्फोट

सातारा -विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला 100 कोटींची ऑफर देण्यात आली होती, मात्र मी ती धुडकावली होती, असा सर्वात मोठा गौप्यस्फोट आ. शशिकांत शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोरेगाव येथे पत्रकारांशी अनौपचारीक संवाध साधत असताना शशिकांत शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

गेल्या वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी भाजपने महाराष्ट्रात मेगा भरती केली. इतर पक्षातील मोठमोठे नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपवासी झाले. अशीच ऑफर मलाही आल्याचा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. शशिकांत म्हणाले, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता.

भाजपमध्ये प्रवेशानंतर तुम्हाला मंत्रीपद देतो असे सांगुन पोटनिवडणुकीत 100 कोटी खर्च करण्याची ऑफरही दिली असल्याचा धक्कादायक खुलासा आ. शशिकांत शिंदे यांनी केला आहे. मात्र ही ऑफर त्यावेळेस मी नाकारली होती आणि यापुढेही नाकारणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. मी पवारांचा सच्चा कार्यकर्ता आहे, असल्या आमिषांना मी कधीच बळी पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.