सातारा ( प्रतिनिधी ) – विधानसभा निवडणूकीत भाजपकडून मला प्रवेश करण्यासाठी १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पण ती मी धुडकावली राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यावेळी भाजप ने महाराष्ट्रात मेगा भरती केली. इतर पक्षातील मोठमोठे नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपवासी झाले. अशीच ऑफर मला आल्याचा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला असल्याचा दावा आ.शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
या प्रवेशानंतर तुम्हाला मंत्रीपद देतो असे सांगुन पोटनिवडणुकीत १०० कोटी खर्च करण्याची ऑफर ही भाजपने दिली असल्याचा धक्कादायक खुलासा आ.शशिकांत शिंदे यांनी केला आहे. मात्र ही ऑफर त्यावेळेस मी नाकारली होती आणि यापुढेही नाकारणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगीतले.