आमदार आकाश विजयवर्गीयला भाजपाची नोटीस

इंदौर – नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण करणारे आमदार आकाश विजयवर्गीय यांना भाजपाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीद्वारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या अगोदर मंगळवारी पंतप्रधान मोदींनी भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आमदार आकाश विजयवर्गीय यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, अशा प्रकारे गैरवर्तणूक करणारा व्यक्ती हा कोणाचाही मुलगा असो, त्याला पक्षातून काढायला हवे. त्या अनुशंगाने ही नोटीस पाठवण्यात आली असल्याची चर्चा आहे.

यासंबंधी भाजपाचे खासदार राजीव प्रताप रूडी यांनी सांगितले की, पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे चिरंजीव आकाश विजयवर्गीय यांच्याबद्दल पंतप्रधान मोदी अतिशय नाराज आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारची वर्तवणुक कधीच खपवून घेतली जाणार नाही. मग तो कुणाचाही मुलगा किंवा खासदार असला तरी फरक पडणार नाही. अशी माणसे पक्षात नकोत व योग्य वर्तवणुक ठेवायला हवी.

Leave A Reply

Your email address will not be published.