भाजपचा मूक मोर्चा – भांगरे

अकोले – राजूर येथे गेले 2 महिने पोलिसांनी अवैध धंदे बंद केले आहेत. त्यांनी गणेश विसर्जन हाणामारीत निपक्षपाती भूमिका बजावली. त्याला छेद देणारी भूमिका आमदारांनी घेतल्याने पोलीस समर्थनार्थ येत्या सोमवारी राजूरमध्ये प्रशासन समर्थनार्थ भाजपतर्फे “मूक मोर्चा’ काढला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते अशोकराव भांगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला शिवाजी धुमाळ, नितीन जोशी, शरद कोंडार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्‍याचे आमदार हे अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींची सुपारी घेवून काम करीत असल्याचा पलटवार करून शेंडी येथील गुन्हा हा त्याचा अस्सल नमुना आहे. असा हवाला त्यांनी दिला. काल आमदार पिचड यांनी राजूर दंगल सुपारी घेवून पोलिसांनी घडवून आणली असा आरोप केला होता. गेले दोन महिने राजूर पोलिसांनी अवैध धंदे बंद केले. त्यामुळे जे याला विरोध करीत आहेत. त्यांना आमदार समर्थन कसे देतात असा सवालही त्यांनी केला. राजूर गावाच्या सरपंच आमदारांच्या मातोश्री आहेत. त्यांनी अवैध धंदे बंद केले. मात्र आमदारांनी ते सुरू केले असा आरोपही त्यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजूर दंगल आमदार पुरस्कृत होती. त्यात आदिवासी पोलीस मुंढे व डगळे यांनाच कसे दगड मारले गेले? आमदार पुरस्कृत ही दंगल होती असा वारंवार आरोप करून शेंडी येथे सोडणर हा मद्यपी मद्य पिवून व बेहोश होऊन विसर्जन मिरवणुकीत सामील झाला होता. त्याला कोणीही मारहाण केली नाही. शिवाय सर्व प्रकार घडताना तोच वाहनावरून पडला. शिवाय चालत घरी गेला. आणि पोलिसांवर दबाव आणून आमदार आमच्या कुटुंबावर व मुलावर 302 कलम लावू पाहत आहे. याचा आपण निषेध करतो असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)