जामखेडच्या नूतन गटविकास अधिकाऱ्यांच्या सत्कारासाठी भाजप-राष्ट्रवादीत रस्सीखेच

जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी यांची बदली झाल्याने त्याच्या जागेवर रुजू झालेले नूतन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या स्वागत सत्कारासाठी राष्ट्रवादी-भाजपात चांगलीच रस्सीखेच पाहण्यास मिळाली. काल दिवसभर राष्ट्रवादी-भाजपा कडून सत्कार संभारंभाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत होते.

जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी यांची नुकतीच विदर्भात बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर अमरावती येथून प्रकाश पोळ यांची गटविकास अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काल दि. १४ रोजी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी जामखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार घेतला.

दरम्यान, लगेचच पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोळ यांचा सत्कार केला. त्यानंतर भाजपच्या वतीने पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवान मुरूमकर,उपसभापती रवी सुरवसे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोळ यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर राष्ट्रवादी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्कार संभारंभाचे फोटो सोशल मीडियावर टाकले. यामुळे नुतून गटविकास अधिकारी पोळ जामखेड मध्ये आल्या आल्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.