भाजप, सेनेनंतर आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण

मुंबई: भाजपा पाठोपाठ शिवसेना देखील सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीन नंबरचा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे.

राष्ट्रवादीला मंगळवारी संध्याकाळी ८:३० वाजेपर्यंत सरकार स्थापनेसाठी मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे आज रात्री व उद्या दिवसभर पुन्हा बैठकांचे सत्र चालू होणार आहे. त्यातच शिवसेनेला काँग्रेस ने तोंडघशी पाडल्यानंतर शिवसेनेची भूमिका देखील काय राहील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर भाजप या सगळ्या परिस्थितवर बारीक लक्ष ठेवून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.