लखनौ – उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार कौशल किशोर यांच्या मुलावर आज लखनौ मध्ये भल्या सकाळी गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन तपास केला असता हा बनवाचा प्रकार असल्याचे दिसते आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.
काही जणांना अडकवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. आयुष असे या मुलाचे नाव आहे, तो 30 वर्षांचा आहे.
आपल्यावर मध्यरात्री दोनच्या सुमाराला गोळीबार झाला असे त्याने पोलिसांना सांगितले होते. खासदाराच्या मुलावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची पोलिसांनी तातडीने गंभीर दखल केली. त्याच्या संमतीनेच त्याच्या मेव्हण्याने त्यांच्यावर सुरक्षित ठिकाणी गोळीबार केला. आयुषचे वडिल हे मोहनलालगंज मतदार संघाचे खासदार आहेत.
या प्रकरणात अद्याप कोणाचीच तक्रार नसल्याने आम्ही अजून गुन्हा दाखल केलेला नाही असे पोलिसांनी सांगितले पण या प्रकरणातील शस्त्र सापडल्यानंतर ती प्रक्रिया पुर्ण केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. आपणच आयुषवर गोळ्या चालवल्या असल्याची कबुली आयुषच्या मेव्हण्याने दिली आहे. दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.