Dr. Hemant Vishnu Savra : पालघरचे भाजप खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या गाडीचा आज सकाळी घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला.

समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या गाडीचा जोरदार धडक दिल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे. सुदैवाने खासदार या दुर्घटनेतून सुखरूप बचावले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांची गाडी मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. घोडबंदर रोडवरून प्रवास करत असताना गाडी चुकीच्या बाजूने येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी समोरून येणाऱ्या डंपरने गाडीला जोरदार धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

या घटनेत खासदारांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र चालक जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच नायगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातास नेमके कोण जबाबदार आहे आणि गाडी रॉंग साईडने कशी आली, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

हेही वाचा : us-iran-war: “अमेरिका-इस्रायल संबंध तोडण्याचे वचन…”; ट्रम्प यांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर तेहरानचा इशारा