पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत भाजप खासदाराचे अजब तर्कट; म्हणाले…

भोपाळ – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना आणि त्याविरोधात नाराजीची भावना असताना भारतीय जनता पार्टीच्या एका खासदाराने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

जर पेट्रोलचे दर वाढत असतील तर त्याच प्रमाणात लोकांचे उत्पन्नही वाढले आहे असे या खासादर महाशयांनी म्हटले आहे. तसेच इतर बाबींप्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे खापरही त्यांनी अगोदरच्या कॉंग्रेसच्या राजवटीवर फोडले आहे.

म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढले आहे, त्याच प्रमाणात लोकांचे उत्पन्नही वाढले आहे. एकट्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत. या देशाचे दुर्दैव हे आहे की 55 वर्ष येथे कॉंग्रेस सरकारने राज्य केले.

त्यांनी येथे अशी कोणतीही पायाभूत सुविधा निर्माण केलेली नाही की ज्यामुळे या किंमती वाढण्यास प्रतिबंध होईल. परंतु नरेंद्र मोदी यांचे सरकार या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.