उदयनराजे म्हणतात; मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवण्याची गरज

सातारा: संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली.

मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे उद्या उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. पक्ष कोणता का असेना मराठा आरक्षणासाठी आता अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले.

आरक्षण हे वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आलं, कोणाचं काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का?, असा सवालही यावेळी उदयनराजेंनी उपस्थित केला. गायकवाड समिचीचा अहवाल त्याचं व्यवस्थित वाचन झालं नाही, झालं असतं तर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला नसता, असा दावाही उदयनराजे भोसले यांनी केला.

खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.