सातारा – भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आलिशान ताफ्यात नवीन कारची भर पडली आहे. उदयनराजे भोसले यांनी नवीन बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. नव्या कारचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CU9iuT1vvPS/?utm_source=ig_web_copy_link
बवेरीयन मोटर्स प्रा. ली. येथून त्यांनी बीएमडब्लू या कंपनीची TEX 5 ही गाडी विकत घेतली. उदयनराजे भोसले यांच्या गाडीचा नंबरही 007 असा आहे. नव्या बीएमडब्लू कारला MH 11 D D 007 हाच नंबर घेतला आहे. ही नवीन कार पुण्यातून घेतली असून या कारची किंमत एक कोटी रूपये आहे.
उदयनराजें यांनी नव्या कारसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसून येत आहे. आतापर्यंत उदयनराजे यांच्या ताफ्यात ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार होत्या. त्यात आता बीएमडब्लूची भर पडली आहे.