भाजप खासदार नंदकुमारसिंह चौहान यांचे निधन

भोपाळ – भारतीय जनता पक्षाचे मध्यप्रदेशातील खासदार नंदकुमारसिंह चौहान यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. गेल्या महिन्यात त्यांना गुरूग्रामच्या मेदांता हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे काल रात्री निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर बुऱ्हाणपुर जिल्ह्यात त्यांच्या शहापुर या गावी उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शहापुर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

नंतर 11 वर्षे त्यांनी मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर 1996 पासून सलग सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.