नवीदिल्ली – आजपासून दिल्ली विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन सुरु झाले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून हे अधिवेशन चांगलच वादळी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होते. प्रशासनाच्या मुद्द्यावर उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आप सरकारने अखेर आजपासून म्हणजेच सोमवारपासून दिल्ली विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशनाला सुरुवात केली.पहिल्याच दिवशी दिल्लीतील वायू प्रदूषणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांनी यासाठी परवानगी दिलेली नाही.
आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी यावेळी भाजप आमदारांनी अनोखं आंदोलन केल्याचं पाहायला मिळाले. राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या गंभीर स्थितीबाबत भाजप आमदारांनी यावेळी अनोखे निदर्शन केले. भाजपचे अनेक आमदार ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आणि ऑक्सिजन मास्क घालून दिल्ली विधानसभेबाहेर दाखल झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
यापूर्वी देखील मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासमोर प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित केले परंतु त्यांनी याबाबत कोणताही ठोस रिस्पॉन्स न दिल्याचे भाजप आमदारांनी यावेळी सांगितले. तसेच नुकत्याच आलेल्या प्रदूषण अहवालाचा दाखल देत दिली प्रदूषणाच्या बाबत पहिल्या क्रमांकावर आहे आणि ही खूप अपमानजनक बाब असल्याचे देखील यावेळी भाजप आमदार म्हणाले.
Delhi Assembly: BJP MLAs sport oxygen cylinders, gas masks
Read @ANI Story | https://t.co/Ihg4k81kBg#BJP #DelhiLegislativeAssembly #OxygenMask #DelhiPollution pic.twitter.com/czDHG86YsS
— ANI Digital (@ani_digital) January 16, 2023
आमदार थेट ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घालून विधानभवनात आल्यामुळे विधानसभा अध्यक्ष गोयल यांनी सर्व आमदारांना मास्क आणि ऑक्सिजन सिलेंडर बाहेर ठेवण्यास सांगितले. परंतु आमदारांनी सूचनांचे पालन न केल्याने अखेर अध्यक्षांनी सर्व सिलेंडर बाहेर मार्शलद्वारे बाहेर पाठवून दिले. उप राज्यपालांनी कामात केलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा सुरु झाल्याने सभागृहात गोंधळ झाला आणि कामकाज काही कालावधीसाठी तहकूब करावे लागले.