सोलापुरात भाजप खासदार आणि आमदारांचे धरणे आंदोलन; औषधांचा पुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्याची मागणी

सोलापूर, दि. 13 – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लोक करोनाच्या साथीमध्ये वेळेवर औषधं, इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन मिळत नाही आहेत. याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी भारतीय जनता पार्टीच्या खासदार – आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषण केले. सोलापूरला रुग्ण अधिक आणि शासनाच्या सुविधा तोकड्या पडल्या.

अनेक लोक वेळीच उपचार न मिळाल्यानं मृत्यू पावले. याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच आहे. सोलापूरसाठी मिळालेली औषधं, इंजेक्‍शन इतर जिल्ह्यांना दिली गेली असा आरोपही यावेळी करण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात यावेळी घोषणाबीज करण्यात आली. उजनीच्या पाण्याचा प्रश्नही उपोषणाला बसलेल्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. उजनीचं एक थेंबही पाणी अन्यत्र जावू दिले जाणार नाही असा निर्धारही करण्यात आला.

सुमारे तासभर हे उपोषण चाललं यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. उपोषणावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, जयसिध्देश्वर शिवाचार्य, सर्वश्री आमदार विजय देशमुख, सुभाष देशमुख, प्रशांत परिचारक, राजा राऊत, रणजितसिंह मोहिते – पाटील, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान आवताडे आदी सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.