Maharashtra Politics : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांवर टीका करणारे भाजप आमदार प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आज अंतरवाली सराटी येथे महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये भावनिक संवाद रंगला असून, प्रसाद लाड यांनी “जर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन,” असे मोठे विधान केले. (Maharashtra Politics) 30 मेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी अंतरवालीत जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना लाड म्हणाले, “मी नेता किंवा आमदार म्हणून नाही, तर समाजाचा एक सामान्य माणूस आणि तुमचा लहान भाऊ म्हणून आलो आहे. तुमच्या मनातला द्वेष दूर व्हावा, हीच इच्छा आहे.” (Maharashtra Politics) यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू मांडत, “गेल्या 70 वर्षांत कोणत्याही मराठा नेत्याने केले नाही ते फडणवीसांनी केले,” असे म्हटले. तसेच “मी राजकारणावर धंदा करत नाही, जातीसाठी माती खायला तयार आहे,” असे सांगत 30 मेचे उपोषण मागे घेण्याची विनंतीही त्यांनी जरांगे यांना केली. (Maharashtra Politics) दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा उल्लेख करताना प्रसाद लाड भावूक झाले. “माझ्या आईवरून शिवीगाळ करण्यात आली. मला खूप वेदना झाल्या. मला सांगा कुठे येऊ, मला मारा, असे म्हणताना त्यांचा आवाज दाटून आला. (Maharashtra Politics) Maharashtra Politics : …तर आमदारकीचा राजीनामा देईन; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं विधान यावर उत्तर देताना मनोज जरांगे यांनी अंतरवालीतील लाठीहल्ल्याची आठवण करून दिली. “तुमची आई आमची आईच आहे. पण ज्या दिवशी आमच्या आई-बहिणींना मारहाण झाली, त्यावेळी आम्ही काय करायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गृहमंत्री म्हणून फडणवीसांवरही त्यांनी टीका केली. (Maharashtra Politics) यावेळी जरांगे यांनी सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. “58 लाख कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्रे का दिली नाहीत? मंडल आयोगाचा सर्वे दाखवा. हैदराबादचा जीआर असताना वाटप का बंद केलं?” अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. (Maharashtra Politics) मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या : (Maharashtra Politics) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे सातारा, कोल्हापूर, पुणे, मिरज संस्थांसाठी GR काढावा आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी सारथीच्या योजना पुन्हा सुरू कराव्यात कुणबी प्रमाणपत्रधारकांना व्हॅलिडिटी द्यावी स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करावे शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी या भेटीनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काही तोडगा निघतो का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)