छत्तीसगड नक्षलवाद हल्ला : 5 जवानांसह भाजपच्या आमदाराचा मृत्यू

छत्तीसगड – दतेंबाडा येथे भाजपच्या ताफ्यावर नक्षवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात छत्तीसगड राज्य पोलीस दलातील 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच या हल्ल्यात भाजपचे आमदार भीम मंडवी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर भूसुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये आमदार आणि पाच जवानांचाही मृत्यू झाला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान होणार आहे. याच प्रचारासाठी भीमा मंडावी बैठका घेत होते.नक्षलवाद्यांनी भाजप आमदाराच्या ताफ्यावर पाळत ठेवत स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर गोळीबारही केला.

या हल्ल्यानंतर दंतेवाडा परिसरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. घटनास्थळी अतिरिक्त पथक पाठवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच 11 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाचे पथक आणि अन्य सुरक्षा दल आजपासून मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघणार आहेत. त्याच्याआधी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्यामुळे परिसरात अलर्ट देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.