मुंबई – भाजपाचे आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. आशिष शेलार यांना काल (सोमवारी) अनेकवेळा धमकीचे फोन येत होते. या प्रकरणी मुंब्रा येथून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, मागील महिन्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांना दुबईहून धमकीचे फोन आले होते.
सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यानंतर आता विरोधी पक्षातील बड्या नेत्याला धमकीचे फोन आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.