मुंबई – राज्यात काही दिवसांपासून करोनाचा प्रकोप वाढत आहे. आता करोनाचे रुग्ण उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होताना दिसून येत आहे. आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना करोनाची लागण झाली आहे.
शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी ट्विट केले की, मी कोविड-19ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले.