नवी दिल्ली – उत्तराखंडमधील ज्वालापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश राठोड यांच्यावर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्तीने अत्याचार आरोप केला आहे. याबाबत महिलेने पोलिसांत धाव घेत राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मात्र सुरेश राठोड यांनी आपल्या वरील आरोप फेटाळले आहे. त्यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करत सूडाच्या भावनेतून खोटी तक्रार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
तत्पूर्वी, आमदार सुरेश राठोड यांनी पीडित महिलेच्या पतीच्या विरोधात खंडणी मागून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला होता. तेव्हा महिलेच्या पतीसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती.