प्रियंकांना ‘पप्पूची पप्पी’ म्हणणे भाजप मंत्र्याला महागात; आयोगाची नोटीस  

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य सुरु झाली आहेत. यावर आता निवडणूक आयोगानेही कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री महेश शर्मा काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पप्पूची पप्पी असे संबोधले होते. हे वक्तव्य महेश शर्मा यांना चांगलेच महागात पडले असून निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच २४ तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे. दरम्यान, आचारसंहितेनुसार राजकीय नेते कोणत्याही विरोधकांच्या वैयक्तिक जीवनावर वक्तव्य करू शकत नाही.

काय म्हणाले होते महेश शर्मा 
पप्पू म्हणतो की पंतप्रधान बनणार, मायावती, अखिलेश पप्पू आणि आता तर पप्पूची पप्पी (प्रियांका गांधी) देखील आली आहे. त्या याआधी देशाच्या कन्या नव्हती का, काँग्रेसच्या कन्या नव्हती का, सोनिया यांच्या कुटुंबातील कन्या नव्हत्या का, आता नाही आहे का, पुढे राहणार नाही का, काय नवीन घेऊन आल्या आहेत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, आधी नेहरू, मग राजीव गांधी, नंतर संजय गांधी आणि आता राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यापेक्षा अधिक काही पाहायचे असेल तर आमचे पंतप्रधान वाघ नरेंद्र मोदी यांना पाहा, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.