नवी दिल्ली – हरियाणाचे गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज यांनी हिजाबवर वादग्रस्त ट्विट केले आहे. अनिल विज यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की,’महिलांना पाहून ज्या पुरुषांचं मन विचलित होत, त्यांनीच महिलांना हिजाबची सक्ती केली आहे, असा दावा अनिल विज यांनी केला आहे. विज यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
जिन पुरुषों का महिलाओ को देखकर मन मचलता था उन्होंने ही महिलाओं को हिजाब डालने के लिए मजबूर किया । आवश्यकता तो अपने मन को मजबूत करने की थी परंतु सजा महिलाओं को दी गई उनको सिर से लेकर पांव तक डाक दिया। यह सरासर नाइंसाफी है । पुरुष अपना मन मजबूत करे और महिलाओ को हिजाब से मुक्ति दें
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) October 13, 2022
नेमकं काय म्हणाले अनिल विज
ज्या पुरुषांचं मन महिलांना पाहून विचलित होत होतं. त्यांनी महिलांना हिजाब परिधान करण्याची सक्ती केली. खरे तर पुरुषांनी आपल्या मनाला आवर घालण्याची गरज होती. पण त्यांनी शिक्षा महिलांना दिली. महिलांना डोक्यापासून पायापर्यंत अंग झाकायला भाग पाडलं. ही अन्याय आहे. पुरुषांनी आता मन कठोर करावं आणि महिलांना हिजाबमधून मुक्ती द्यावी
यापूर्वी अनिल विज यांनीही असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ओवेसी म्हणाले होते की, ‘देशातील मुस्लिमांची लोकसंख्या कमी होत आहे. यावर विज म्हणाले की, लोकसंख्या कमी होत असेल तर चांगले आहे, पण यामध्येही ‘हम दो-हमारे दो तक लाओ’ पर्यंत आणायला हवी.