भाजप सदस्य नोंदणी अभियान राबवणार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर भाजपाची पक्ष संघटना पुन्हा कामाला लागली आहे. भाजपा संपुर्ण देशभरात लवकरच सदस्य नोंदणी अभियान सुरू करणार आहे.

पक्षाच्या अध्यक्षांच्या निवडणुकीच्या पूर्वी राज्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पार पाडल्या जातील, असे सांगितले जाते. 2019 च्या निवडणुका असल्याने गेल्या वर्षी पक्षाध्यक्षाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. अमित शहा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल संपला होता. परंतु निवडणुकीपर्यंत त्यांना पदमुक्‍त करण्यात आले नव्हते.

संपूर्ण देशभरात भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. राज्यात बुथ स्तरापासून संघटनेची पुनर्रचना होईल. राज्यातील परिषदेचे नवीन सदस्य आपले प्रदेशाध्यक्ष निवडतील. व प्रदेशाध्यक्ष अध्यक्षाची निवड करतील. लवकरच हे अभियान सुरू होईल अशी माहिती पक्षांतर्गत वरिष्ठ सदस्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)